यूरिया खताचा अवाजवी वापर टाळा

यूरिया खताचा अवाजवी वापर टाळा.
  •  यूरिया खताच्या अवाजवी वापरामुळे - जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.
  •  जमिनीतील कर्ब : नत्र यांचे गुणोत्तर कमी होवून सुक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होते. 
  • पालाश , कॅल्शियम , बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते.  
  • जमिनीमध्ये अमोनिया जास्त प्रमाणात तयार होवून नायट्रोबैक्टर सारख्या जीवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 
  • गांडुळ संख्येवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीच्या जडण घडणी वर परिणाम होतो. भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. 
  • पाण्यातील नायट्रेट चे प्रमाण वाढते. जलचर प्राण्यांची हानी होते. 
  • पाण्यातील शेवाळ व पाणवनस्पतींची वाढ खुंटते. हवेचे प्रदुषण होते. 
  • युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेट मध्ये होते. 
  • नायट्रस ऑक्साइड आणि नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायु हवेचे प्रदुषण वाढवतात.

Comments

Popular posts from this blog

NPK Fertilizer Calculator